‘बिबट्या’ : पितृसत्ताक व्यवस्थेला वेशीवर टांगणारा लघुपट
लघुपटातील बिबट्याची आणि त्या लहान मुलीची भेदरलेली नजर मला सारखीच असुरक्षित वाटते. म्हणूनच लघुपटातील स्त्रीला समाजापेक्षा पिंजरा व जंगल अधिक सुरक्षित वाटते. या दृश्याच्या वेळी पुरुषांमधील संवाद ऐकले तर स्त्री कशी पुरुषांकरिता वापरण्यासाठीची ‘वस्तू’ आहे, हेच समोर येते. हे आजचं समाज वास्तव आहे. ते प्रखरपणे लघुपटातुन पुढे आलंय. हा लघुपट विषमाताधारीत व्यवस्थांच्या अंताचा एक धागा बनो.......